टाक्या व लाइन आहे तरीही ९ गावे तृषार्तच

By admin | Published: May 19, 2016 04:08 AM2016-05-19T04:08:52+5:302016-05-19T04:08:52+5:30

२००९ मध्ये जीवनप्राधिकरणामार्फत ९४ लाख १२ हजार २९० रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या व पाइपलाइन बसविण्यात आली.

Tanks and lines are still 9 villages everywhere | टाक्या व लाइन आहे तरीही ९ गावे तृषार्तच

टाक्या व लाइन आहे तरीही ९ गावे तृषार्तच

Next


पालघर : २६गावे वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वरखुंटी, कमारे, पडघे, वाकोरे, बिरवाडी, देवखोप, नंडोरे, शेलवाली -अंबाडी या गावात २००९ मध्ये जीवनप्राधिकरणामार्फत ९४ लाख १२ हजार २९० रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या व पाइपलाइन बसविण्यात आली. तरीही ही गावे आजही तृषार्तच आहेत. गळती व अन्य त्रुटींमुळे या ग्रामपंचायती या योजना ताब्यात घेण्यास तयार नाहीत व जीवन प्राधिकरण दुरु स्त करु न देण्यास तयार नाही. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांसह येतील ग्रामस्थांचे घसही कोरडेच राहिलेले आहेत.
हमरी तुमरीच्या कैचीत अडकलेली ही योजना चालू करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळवून द्यावे, इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)

Web Title: Tanks and lines are still 9 villages everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.