न्यायाधीश परीक्षेत कोल्हापुरातील तन्वी शेख राज्यात पाचवी, पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:56 IST2025-04-01T15:56:01+5:302025-04-01T15:56:25+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत लिशा ...

न्यायाधीश परीक्षेत कोल्हापुरातील तन्वी शेख राज्यात पाचवी, पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत लिशा हॉटेल, कदमवाडी येथील तन्वी रहिमान शेख या उत्तीर्ण झाल्या. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी राज्यात पाचवा क्रमांक पटकावला.
त्यांनी काही काळ पुण्यात परीक्षेची तयारी केली. २०२३ पासून त्या कोल्हापुरात विधी सेवा प्राधिकरण येथे सहायक लोक अभिरक्षक पदावर कार्यरत आहेत. मुलीने न्यायाधीश बनावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. २०२२ मध्ये वडिलांचे निधन झाले. वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचा विशेष आनंद असल्याची भावना तन्वी यांनी व्यक्त केली.