CoronaVirus : टास्क फोर्स राज्यातील डॉक्टरांशी संवाद साधणार, मुख्यमंत्रीही मार्गदर्शन करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 03:11 PM2021-05-15T15:11:55+5:302021-05-15T15:16:15+5:30
CoronaVirus : उद्या रविवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मीडियावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. यातच कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता.
उद्या रविवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मीडियावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार या विषयावर महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित हे बोलणार असून हा कार्यक्रम OneMD च्या फेसबुक https://www.facebook.com/100441008205176/posts/304013491181259/
आणि यूट्यूब चॅनेलवर https://youtu.be/7dH0X0FTCpc उद्या रविवार १६ तारखेस दुपारी १२ वाजता पहावयास मिळेल.
याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडियावरून देखील याचे प्रसारण करण्यात येईल. या ऑनलाईन कार्यक्रमात डॉक्टर्सनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
देशात लवकरच आणखी पाच लसी; नीती आयोगाची माहिती
देशामध्ये आणखी काही महिन्यांनंतर कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुतनिक या लसींव्यतिरिक्त आणखी ५ कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. ज्या आणखी पाच लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नोवावॅक्स ही लस अमेरिकेत तर बाकीच्या चार लसी भारतातच तयार केल्या आहेत. १. बायो ई सबयुनिट वॅक्सिन, २. झायडस कॅडिला डीएनए, ३. एसआयआय-नोवावॅक्स, ४. बीबी नेझल वॅक्सिन आणि ५. जिनोव्हा एमआरएनए या लसी आहेत.
मुंबईत कोरोना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक,टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची पालिका घेणार मदत
मुंबईत मागील ११ दिवसांपासून कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण दोन टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांकडून याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १ मे ते ११ दरम्यान मुंबईत ७८१ कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे, म्हणजेच मृत्युदर हा २.५० टक्के आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन मृत्युदरही एक टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आला आहे. परिणामी, मुंबईतील मृत्युदर नियंत्रणात करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका प्रशासन राज्य कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणार आहे.