महिनाभराने घरच्या जेवणाची चव

By admin | Published: April 14, 2016 01:32 AM2016-04-14T01:32:38+5:302016-04-14T01:32:38+5:30

८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. भुजबळ यांना

Taste of home dining for a month | महिनाभराने घरच्या जेवणाची चव

महिनाभराने घरच्या जेवणाची चव

Next

मुंबई : ८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. भुजबळ यांना तब्बल महिनाभराने घरच्या जेवणाची चव चाखायला मिळणार आहे. घरचे जेवण मिळावे यासाठी भुजबळांनी अर्ज केला होता. तो विशेष सत्र न्यायाधीश न्या. पी. आर. भावके यांनी बुधवारी मंजूर केला.
न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने ईडीने बुधवारी भुजबळ आणि पुतणे समीर यांना विशेष न्यायालयात हजर केले. ईडीचे वकील अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांनी या दोघांविरोधात केलेले आरोपपत्र दाखल करून घ्यावे व त्यानुसार पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती न्या. भावकेंना केली. न्या. भावकेंनी या मागणीवरील सुनावणी २० एप्रिलपर्यंत तहकूब करत छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ केली. भुजबळ, कुटुंबियांना मोक्का लावा, अशी विनंती करणारा आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन यांनी केलेला अर्ज न्या. भावकेंनी फेटाळून लावले.
१३ मार्चला भुजबळ यांना ईडीने अटक केली. त्यानंतर १७ एप्रिलला त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानुसार आर्थररोड कारागृहातील १२ नंबर सेलमध्य े(कसाब सेल) त्यांना बंद केले आहे. या सेलमध्ये बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी पीटर मुखजीर्ही बंद आहे. पीटरला न्यायालयाच्या मंजुरीने घरचे जेवण मिळते. आतापर्यंत आता न्यायालयाने परवानगी दिल्याने भुजबळांनाही घरचा डबा येणार आहे. त्यामुळे महिनाभराने त्यांना घरच्या जेवणाची चव चाखायला मिळणार आहे.

मोक्का लावण्याची विनंती फेटाळली
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोक्का लावा, अशी विनंती करणारा अर्ज आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन यांनी केला होता. या प्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण पुरवा असेही त्यांनी म्हटले होते. तो अर्ज न्या. भावकेंनी फेटाळून लावले.

Web Title: Taste of home dining for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.