बदलापुरात तीन दिवसात चित्र संगीतावर साकारले रतन टाटा यांचे चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 08:39 PM2021-09-06T20:39:53+5:302021-09-06T20:41:05+5:30
3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर असे तीन दिवस हे चित्र प्रेक्षकांच्या उपस्थितीत 'चित्र संगीत' या कार्यक्रमाद्वारे साकारण्यात आले.
अंबरनाथ: बदलापूर मधील प्रख्यात चित्रकार सचिन जुवाटकर यांनी जग प्रसिद्ध उद्योजक आणि देश भक्त रतन टाटा यांचे चित्र साकारले आहे. चित्र संगीताच्या माध्यमातून हे अनोखे चित्र रेखाटण्यात आले आहे. 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर असे तीन दिवस हे चित्र प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्र संगीत या कार्यक्रमाद्वारे साकारण्यात आले.
कलारसिकांना हे चित्र साकारताना प्रत्यक्ष अनुभव घेता आले असून सचिन जुवाटकर हे मागील पाच वर्षांपासून चित्र-संगीत या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. एकीकडे संगीताचा कार्यक्रम आणि दुसरीकडे चित्र रेखाटण्याचा अनोखा कार्यक्रम अशी वेगी कल्पना जुवाटकर यांनी साकारली आहे. प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देव-देवतांचे चित्र रेखाटली आहेत.
जुवाटकर यांच्या चित्रसंगीत या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे सचिन जुवाटकर हे कॅनव्हासवर चित्र साकारत असताना दुसरीकडे नृत्य,शास्त्रीय संगीत,गायन, इत्यादी मनोरंजक कार्यक्रम सुरू असतात. यावर्षी सचिन जुवाटकर यांनी रतन टाटा यांचे चार बाय पाच आकाराच्या कॅनव्हासवर चित्र साकारले आहे. बदलापूर पश्चिमेच्या यशस्विनी भवन येथे हा कार्यक्रम पार पडणार पडला. चित्र संगीताच्या माध्यमातून चित्र रेखाटण्याची अनोखी कल्पना जी वाडकर यांनी केलेल्या अनेक वर्षांपासून आत्मसात केली आहे. त्यांच्या या चित्र संगीताच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.