तटकरे पुन्हा राज्यात सक्रिय!

By admin | Published: May 18, 2014 12:24 AM2014-05-18T00:24:31+5:302014-05-18T00:24:31+5:30

राज्य मंत्रीमंडऴातील आपल्या मंत्री पदाच्या जबाबदारी सोबत अधिक सक्रीय होतील अशी त्याची कार्यपद्धती आणि कार्यकत्यांचा ठाम विश्वासआहे.

Tatkare again active in the state! | तटकरे पुन्हा राज्यात सक्रिय!

तटकरे पुन्हा राज्यात सक्रिय!

Next
>यगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदा पासून राज्य सरकार मध्ये विविध मंत्रीपदावर आणि आता जलसंपदा मंत्रीपदी प्रभावीपणो काम करणारे तटकरे आगामी काऴात राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सक्रीय होणार यात शंका नाही. 1985 मध्ये विधानसभेला त्यांना पराभव पत्करावा लागला होता, तेव्हा त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचे काम केले होते तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेच्या क्षणापासून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत उजवे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सातत्याने आपल्या नेतृत्व कौशल्याने पक्षाला सक्षम करण्यात मोठे योगदान दिले आहे. येत्या विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर आताही ते याच पद्धतीने राज्य मंत्रीमंडऴातील आपल्या मंत्री पदाच्या जबाबदारी सोबत अधिक सक्रीय होतील अशी त्याची कार्यपद्धती आणि कार्यकत्यांचा ठाम विश्वासआहे.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना जो पराभव पत्करावा लागला त्याचा विचार करता रायगडमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री आणि रायगडचे पालकमत्री सुनील तटकरे यांचा केवळ 221क् मतांनी झालेला पराभव हा अगदी निसटता आहे. परिणामी तो कार्यकत्र्याना आणि पक्षाच्या नेत्यांना देखील वेदना दायी असाच आहे. पराभव मान्य करणो, तो खुलेपणाने आणि खिलाडू वृत्तीने स्वीकारुन पुढे जायचे आणि जे जनसामान्यंच हे बळ देतात त्याच्यांत मिसळून कामाला लागायच हा माझा स्वभावच आहे. निवडणूक झाली, आता विश्रंती कसली, आज पासूनच कामाला लागलो. लांब उडीतल यश गाठायच असेल तर लांब उडी मारण्यासाठी चार पावल मागे यावे लागत. मी देखील एक खेळाडू आहे, अशी अत्यंत खिलाडू वृत्तीने परंतू अत्यंत सूचक भूमिका तटकरे यांनी आज त्यांच्याशी संवाद साधला असता व्यक्त केली आहे. मतदारांनी दिलेला कौल कार्यकत्र्याना थोडसे ना उमेद करणारा असला तरी त्यांची समजूत काढून  त्यांनी आपापल्या क्षेत्रत कार्यरत होण्यासाठी मी संवाद साधतो आहे. उद्या माङया दौ:याला प्रारंभ करित आहे आणि नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणो कार्यरत होत असल्याचे त्यांनी पूढे सांगीतले. 1985 मध्ये विधानसभा निवडणूकीत मी प्रथम पराभव अनूभवला, आणि निकालाच्या दूस:याच दिवशी कामाला देखील लागलो होतो.
 
पराभव मान्य करणो, तो खुलेपणाने आणि खिलाडू वृत्तीने स्वीकारुन पुढे जायचे आणि जे जनसामान्यंच हे बळ देतात त्याच्यांत मिसळून कामाला लागायच हा माझा स्वभावच आहे.
कार्यकत्र्याना देखील नवे बळ गवसले होते. आताही त्याच पद्धतीने कामला लागलो आहे. निवडणूकीत जय-पराजय असणारच. निकाला नंतर थांबून कधीही चालत नाही. 
निकालानंतर नव्या उत्साहाने कामाला लागायचे असते, तरच सार्वजनीक जिवनात कार्यकर्ता टिकून राहू शकतो. राज्याच्या पक्ष संघटनात्मक कामात देखील मी लक्ष घालणार असल्याचेही तटकरे म्हणाले.

Web Title: Tatkare again active in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.