राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी तटकरे
By admin | Published: June 26, 2014 02:37 AM2014-06-26T02:37:43+5:302014-06-26T02:37:43+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची आज निवड करण्यात आली.
Next
>मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची आज निवड करण्यात आली. तटकरे यांच्या जागी मावळते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा गुरुवारी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी होणार आहे.
राष्ट्रवादीच्या विस्तारित प्रदेश कार्यकारिणीची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत येथे झाली. कौटुंबिक अडचणींमुळे आपण पक्षाला पूर्णवेळ देऊ शकत नसल्याने अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती भास्कर जाधव यांनी केली. प्रदेशाध्यपदासाठी तटकरे यांच्या नावाचा प्रस्ताव त्यांनीच ठेवला. कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी त्याला अनुमोदन दिले. तटकरे आणि जाधव दोघेही कोकणातले, पण दोघांमधून विस्तव जात नाही. उभयतांची खांदेपालट करून पवारांनी सामाजिक संतुलन साधण्याचा प्रय} केला आहे. तटकरे यांना प्रदेशाध्यपदी बसवून दूर गेलेल्या ओबीसी समाजाला जवळ करण्याचा, तर जाधवांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊन कोकणातील पक्षसंघटन मजबूत करण्याचा हा प्रय} असल्याचे राजकीय जाणकारांना वाटते. तटकरे यांना अध्यक्षपद दिल्यानंतर आता कार्याध्यक्षपद नसेल, असे पक्षाच्या सूत्रंनी सांगितले. भास्कर जाधव यांचा उद्या सकाळी 9 वाजता राजभवनात शपथविधी होणार आहे. त्यांना तटकरेंकडील जलसंपदा खाते दिले जाणार नाही. हे खाते राजेश टोपे यांच्याकडे दिले जाईल व टोपेंकडील उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपद जाधव यांच्याकडे जाईल, असे म्हटले जाते. (विशेष प्रतिनिधी)