तावडे एक नव्हे ६ कंपन्यांचे संचालक - विखे पाटील आणि निरुपनी केला राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार

By Admin | Published: February 26, 2016 08:53 PM2016-02-26T20:53:34+5:302016-02-26T20:53:34+5:30

तावडे यांनी कायद्याचा भंग केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील आणि संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केली.

Tawde not one company director - Vikhe Patil and Nirupani resignation demand for resignation | तावडे एक नव्हे ६ कंपन्यांचे संचालक - विखे पाटील आणि निरुपनी केला राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार

तावडे एक नव्हे ६ कंपन्यांचे संचालक - विखे पाटील आणि निरुपनी केला राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे केवळ एकच नव्हे तर तब्बल सहा कंपन्यांचे संचालक आहेत. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ६० दिवसात कंपनीच्या संचलकपदाचा राजीनामा देणे बंधनकारक असतानाही तावडेंनी कोणत्याच कंपनीचे संचालक पद सोडलेले नाही. तावडे यांनी कायद्याचा भंग केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विखे-पाटील आणि संजय निरुपम यांनी विनोद तावडे यांच्याविरोधातील कागदपत्रांची जंत्रीच सादर केली. विनोद तावडे आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी संचालक असलेल्या श्री मल्टीमिडिया व्हिजन कंपनीला भाजपाने २५ लाख रुपये ट्रेड अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले. त्याची अद्याप परतफेड झालेली नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना तावडे यांनी आपण मानद संचालक असल्याचा खुलासा केला होता. मात्र, कंपनी कायद्यानुसार व्यावसायिक कंपनीत मानद संचालक हा प्रकारच नसतो. शिवाय तावडे यांनी श्री मल्टिमिडिया कंपनीच्या ताळेबंदावर केवळ संचालक म्हणूनच स्वाक्षरी केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.
श्री मल्टिमिडीयासह आणखी सहा कंपन्यांचे संचालक पद तावडे यांच्याकडे आहे. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच या कंपन्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहितीही निवडणुक आयोगापासून लपवून ठेवली. कायद्यानुसार हा गुन्हा असून त्यासाठी सहा महिन्यांच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब तावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विखे पाटील आणि निरुपम यांनी केली.
तावडे यांच्या कंपन्या पुढील प्रमाणे (कंसात नियुक्तीची तारीख)
श्रीरंग प्रिंटर्स प्रा. लिमिटेड (१५ जुलै १९९६), तावडे-नलावडे बिल्डवेल प्रा. लिमिटेड (१ नोव्हेंबर २००२), नाशिक मरिन फीडस् प्रा. लिमिटेड (१२ मार्च २००३), इनोव्हेटीव्ह आॅफशोअरींग प्रा. लिमिटेड (३० सप्टेंबर २०१०) आणि महाराष्ट्र फील्म स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (२ नोव्हेंबर २०१४).

डीन नंबरचाही घोटाळा उघड
नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांचा आणखी एक घोटाळा काँग्रेसने उघडकीस आणला. गडकरी यांच्याकडे ६ तर तावडेंकडे ३ डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर (डीन), संचालक ओळख क्रमांक) आहेत. कायद्यानुसार एका व्यक्तीच्या नावे केवळ एकच डीन नंबर असू शकतो. ज्यांना आपली मालमत्ता लपवायची असते अथवा गैरप्रकार करणारीच मंडळी एकाहून अधिक डीन नंबर मिळवितात. मंत्री पदावर असणा-या नेत्यांनी सहा-सहा डीन नंबर मिळविले आहेत. स्वच्छ कारभाराचा दावा करणा-या भाजपाचा खरा चेहरा याप्रकारामुळे उघड झाला आहे. या गुन्ह्याबद्दल दोन्ही नेत्यांचा राजीनामा घेवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली.
विनोद तावडे यांच्या नावावर असणारे डीन क्रमांक : ०१७२०२८४, ०२६१८०२३, ०१४२७३७५
नितीन गडकरी यांच्या नावे असणारे डीन क्रमांक : ००४०३७१४, ००१९२१०७, ००१९२१८०, ००२५६९०५, ०१२५९२४३ आणि ०१५९८५२०.

काँग्रेसचे आरोप निराधार - माधव भांडारी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात काँग्रेसने केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत. केवळ आरोपांसाठी आरोप करण्याचा एककलमी कार्यक्रम काँग्रेसने चालविला असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ता माधव भांडारी यांनी केला.

Web Title: Tawde not one company director - Vikhe Patil and Nirupani resignation demand for resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.