तावडेच्या हजर अर्जावर आज होणार सुनावणी

By admin | Published: January 3, 2017 04:46 AM2017-01-03T04:46:01+5:302017-01-03T04:46:01+5:30

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या हजर अर्जावर आज, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे

Tawde's petition will be heard today | तावडेच्या हजर अर्जावर आज होणार सुनावणी

तावडेच्या हजर अर्जावर आज होणार सुनावणी

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या हजर अर्जावर आज, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक असलेला संशयित समीर गायकवाड याच्या दोषारोपपत्र निश्चितीवरही सुनावणी होणार आहे.
६ डिसेंबर २०१६ला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तावडेवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. या दोषारोपपत्रातील माहिती तावडेला सांगण्यासाठी व हा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग करावा, यासाठी त्याला हजर करण्याचा अर्ज तावडेचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी यापूर्वी दाखल केला आहे; परंतु, न्यायालयाने यावर निर्णय घेतलेला नाही. २२ डिसेंबर २०१६ला जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात याबाबत सुनावणी झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Tawde's petition will be heard today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.