कराचा बोझा वाढणार !
By Admin | Published: January 15, 2015 01:03 AM2015-01-15T01:03:15+5:302015-01-15T01:03:15+5:30
नव्या वर्षात ‘अच्छे दिन’ येण्याची आस लावून बसलेल्या नागपूरकरांवर कराचा बोझा लादण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. सत्तारुढ भाजपप्रणित नागपूर विकास आघाडीने मुंबई महापालिका
४० टक्क्यांची वाढ अपेक्षित : कर संकलन व वसुलीची शिफारस
नागपूर : नव्या वर्षात ‘अच्छे दिन’ येण्याची आस लावून बसलेल्या नागपूरकरांवर कराचा बोझा लादण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. सत्तारुढ भाजपप्रणित नागपूर विकास आघाडीने मुंबई महापालिका कायद्यातील तरतुदीचा आडोसा घेत मालमत्ता करात वाढ करण्याचा बेत आखला आहे. एवढेच नव्हे तर कर संकलन व वसुली समितीने बुधवारी आयोजित बैठकीत कर वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
१०० रुपये भरा जलकरातून सुटका करा
ज्यांच्या घरी किंवा रिकाम्या भूखंडावर नळ कनेक्शन नसेल त्यांनाही नियमानुसार जलकर भरावा लागतो. हा जलकर सुमारे ४० टक्क्यांपर्यंत आकारला जातो. आता पाणीपुरवठा कंपनी आॅरेंज सिटी वॉटरने जलकरातून सुटका होण्यासाठी एक नवी योजना आणली आहे. संबंधित व्यक्ती दरमहा १०० रुपये ओसीडब्ल्युकडे जमा करेल तर त्याला मालमत्ता करात जलकर भरावा लागणार नाही. ही योजना नागपूरकांच्या फायद्याची असल्याचा दावा गिरीश देशमुख यांनी केला.
असे होऊ शकतात बदल
मालमत्ता करासाठी शहराला सहा भागात विभागण्यात आले आहे. या आधारावर मालमत्तांचे वर्गीकरण करून कर आकारला जाईल.
सध्या प्रति वर्ग मीटर ४ ते ८ रुपये कर वसूल केला जातो. यात वाढ होऊन ६ ते ११ रुपये प्रति वर्ग मीटरप्रमाणे कर आकारला जाईल.
मल जल लाभ कर, पाणी लाभ कर, पथ कर प्रत्येकी पाच टक्के करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. कर संकलन समितीने तीन टक्केप्रमाणे आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मलजल कर १२ टक्क्यांहून वाढून १४ टक्के, पाणी पट्टी कर ४० टक्क्यांहून घटवून १० ते १२ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.