थकबाकीदारांच्या घरांसमोर बॅण्ड वाजवून करवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2017 03:50 AM2017-03-13T03:50:56+5:302017-03-13T03:50:56+5:30
येथील नगर परिषदेने करवसुलीसाठी अभिनव फंडा अवलंबिला आहे. मालमत्ता कर थकबाकीदाराच्या घरासमोर बॅण्ड वाजवून त्याला कराचा भरणा करण्याचे आवाहन केले जात आहे.
कारंजा लाड (जि. वाशिम): येथील नगर परिषदेने करवसुलीसाठी अभिनव फंडा अवलंबिला आहे. मालमत्ता कर थकबाकीदाराच्या घरासमोर बॅण्ड वाजवून त्याला कराचा भरणा करण्याचे आवाहन केले जात आहे.
चालू आर्थिक वर्षात कारंजा नगरपरिषदेचे सरासरी ४ कोटी २५ लाख रुपये वसुली उद्दिष्ट आहे. नोटाबंदीच्या काळात मोठ्या संख्येने थकबाकीदारांनी कराचा भरणा केला आहे. अद्याप २ कोटी २५ लाखांची वसुली शिल्लक आहे. या पार्श्वभूमी कर वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाने नोटीसा, सूचना देऊनही थकबाकीदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्याधिकारी वानखडे यांनी करवसुलीचा वेगळाच फंडा शोधून काढला आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांच्या घर अथवा प्रतिष्ठानासमोर बॅण्ड वाजविला जात आहे.