जीएसटी मुळे कर संकलन वाढेल

By admin | Published: March 7, 2017 09:15 PM2017-03-07T21:15:26+5:302017-03-07T21:15:26+5:30

जीएसटी मुळे कर संकलन वाढले तसेच देशाचा जीडीपी वाढण्याची आशा आहे असे प्रतिपादन केंद्रीय उत्पादन खात्याचे सहायक आयुक्त ऋषभ गुप्ता यांनी केले़

Tax collection will increase due to GST | जीएसटी मुळे कर संकलन वाढेल

जीएसटी मुळे कर संकलन वाढेल

Next

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 7: जीएसटी मुळे कर संकलन वाढले तसेच देशाचा जीडीपी वाढण्याची आशा आहे असे प्रतिपादन केंद्रीय उत्पादन खात्याचे सहायक आयुक्त ऋषभ गुप्ता यांनी केले़. सोलापूरच्या केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क कार्यालयातर्फे वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी)संबंधी माहित देण्यासाठी मंगळवारी निर्मलकुमार फडकुले सभागृहात उद्योजक व्यापारी करदाते सेवा पुरवठादार करसल्लागार यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी गुप्ता बोलत होते़ गुप्ता यांनी ह्यप्रस्तावित वस्तू व सेवाकर कायदा व त्यासंबधी कायदा याबाबत माहिती दिली़ जीएसटी अंमलात आणल्यानंतर देशात सध्या अस्तित्वात असणाऱ्या विविध १७ अप्रत्यक्ष कायद्याच्या जागी एक व संपूर्ण देशात एकाच कायद्याने व्यापाऱ्यांची सुटका होऊन त्रास कमी होईल़
केंद्रीय अकबारी शुल्क खात्याचे सोलापूरचे सहायक आयुक्त जी़आऱ देसाई यांनी जीएसटी कायद्यातील नोंदणी प्रक्रिया विवरण पत्रे कर भरणा कर परतावा यासंबंधी माहिती दिली़ यामध्ये नोंदणी तसेच विवरण पत्रे आॅनलाईन भरावयाची असल्याने वेळेची बचत प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले़

विनय खापरे अधीक्षक (पुणे) यांनी उत्पादन शुल्क सेवाकर विक्रीकर नोंदणी असणारे नोंदणी धारकानी वस्तू व सेवाकर कर कायद्यातर्गत नोंदणी करण्यासाठीच पद्धत विशद केली़ कार्यक्रमात शेवटी करदात्यांच्या शंकांना उपस्थित वक्त्यांनी उत्तरे दिली़
या कार्यशाळेत सुरुवातीस कार्यालयातील अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी या कार्यशाळेचा उद्देश सांगितला़ कार्यक्रमास अधीक्षक पी आर देशपांडे , जनसंपर्क अधिकारी राजेश बावीकर यांचे सहकार्य लाभले़ यानंतर सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्स च्या वतीने अध्यक्ष राजू राठी व धवल शहा यांनी अधिकाऱ्यांचा सत्कार केला़

- २० लाखांवर उलाढाल असणाऱ्यांना जीएसटी
या कायद्यातील तरतुदी या पारदर्शी आणि सुटसुटीत असल्याने यासंबंधी वाद तंटे कमी होऊन कर संकलन वाढण्यास मदत होईल तसेच छोटे व्यापारी २० लाख उलाढाल असणाऱ्या व्यापारी सेवा पुरवठादार यांना कर भरावा लागणार नाही तसेच ५० लाख उलाढाल असणाऱ्या व्यापारी यांनी कॉम्पोझीशन स्कीममध्ये आल्यास त्यांना कमी दराने कर भरण्याची मुभा राहील असे ऋषभ गुप्ता म्हणाले़

Web Title: Tax collection will increase due to GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.