जेजे पुलावरील अपघातात टॅक्सी चालक ठार

By admin | Published: August 24, 2015 01:35 AM2015-08-24T01:35:51+5:302015-08-24T01:35:51+5:30

मैत्रिणीसोबत घरी परतत असलेल्या तरुणीचा कारवरचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावरुन दुसऱ्या दिशेने जात असलेल्या टॅक्सीवर धडकल्याची धक्कादायक घटना रविवारी

Taxi driver dies in JJ bridge accident | जेजे पुलावरील अपघातात टॅक्सी चालक ठार

जेजे पुलावरील अपघातात टॅक्सी चालक ठार

Next

मुंबई : मैत्रिणीसोबत घरी परतत असलेल्या तरुणीचा कारवरचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावरुन दुसऱ्या दिशेने जात असलेल्या टॅक्सीवर धडकल्याची धक्कादायक घटना रविवारी पायधुनी येथे घडली. यामध्ये टॅक्सीचालक रमेशकुमार सोमनाथ गुप्ता (४१) जागीच ठार झाला. तर एक प्रवासी जखमी झाला असून जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहे.
लालबाग येथील रहिवासी असलेली आशवी शाह (२०) हुंडाई वेर्ना या कारमधून मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सीएसटीहून जे. जे. पुलाकडून भायखळ्याच्या दिशेने येत असताना तिचा कारवरचा ताबा सुटला. कार दुभाजक ओलांडून सीएसटीच्या दिशेने जात असलेल्या गुप्ताच्या टॅक्सीवर आदळली. यात टॅक्सीचालक गुप्ता जागीच ठार झाले. टॅक्सीतील एक प्रवासी जखमी झाला. तर कारचालक आशवी शाहसह तिची मैत्रीणही या अपघातात किरकोळ जखमी झाली.
घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी गुप्ताचा मृतदेह ताब्यात घेत जखमींना जवळच्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी शाहला निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शाहची वैद्यकीय तपासणी केली असून यामध्ये ती मद्यधुंद नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Taxi driver dies in JJ bridge accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.