बाटलीबंद पाण्यातही ‘टीडीएस’ जास्तच!

By admin | Published: April 20, 2016 05:51 AM2016-04-20T05:51:33+5:302016-04-20T05:51:33+5:30

शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले बाटलीबंद पाणी विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या पाण्यामधील टोटल डिझॉल्व्हड् सॉलिड (टीडीएस) अर्थात, क्षारांचे प्रमाण

TDS is too much in bottled water! | बाटलीबंद पाण्यातही ‘टीडीएस’ जास्तच!

बाटलीबंद पाण्यातही ‘टीडीएस’ जास्तच!

Next

खामगाव (बुलडाणा) : शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले बाटलीबंद पाणी विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या पाण्यामधील टोटल डिझॉल्व्हड् सॉलिड (टीडीएस) अर्थात, क्षारांचे प्रमाण हे ठरावीक पातळीपेक्षा जास्त असल्याचे ‘लोकमत’ने ११ एप्रिल रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे.
‘लोकमत’च्या चमूने खामगाव बसस्थानक परिसरातील हॉटेल्समध्ये पिण्यासाठी ठेवलेल्या थंड आणि तथाकथित शुद्ध पाण्याच्या जारमधील पाण्याचा टीडीएस तपासला असता, तो १२०च्या वर आढळून आला. एका समारंभात आणण्यात आलेल्या जारमधील पाण्याचा टीडीएसही ११५ आढळून आला. विशेष म्हणजे, काही ठिकाणी बाटलीबंद पाण्यामधील क्षारांचे प्रमाण जारमधील पाण्यापेक्षा जास्त होते. पाणी रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पाण्याची गुणवत्ता जमिनीच्या गुणधर्मावरही अवलंबून असते. प्रमाणापेक्षा जास्त फ्लोराईड, खारेपणा, लोहतत्त्व, आर्सेनिकयुक्त पाणी आरोग्यास अपायकारक असते. अशुद्ध पाणी पिण्यात आल्याने बरेच आजार संभवतात. त्यामुळे नागरिकांचा कल आरओ (रिव्हर्स ओसमॉसिस) मिनरल वॉटरकडे वाढला आहे. हेच पाणी थंड करून हॉटेल्समध्ये जारमध्ये विकले जाते. बहुतांश हॉटेल्स, दुकाने, एवढेच काय, मध्यमवर्गीयांच्या घरीदेखील आरओ वॉटरचे जार आढळतात. ग्राहक वाढल्याने अनेकांनी थंड पाण्याचा हा व्यवसाय सुरू केला आहे. उन्हाळ्यात याची वाढती मागणी पाहता, अनेक व्यावसायिक पाणी शुद्ध न करता, फक्त थंड करून वितरित करतात. तहान लागल्यावर पाण्याची गुणवत्ता ही दुय्यम बाब ठरते. त्यामुळे या प्रकारांच्या कुणी फारशा खोलात जात नाही. प्रत्येकाजवळ टीडीएस तपासण्याची यंत्रणासुद्धा नसते. त्याचाच गैरफायदा घेत, व्यवसायिक तुंबड्या भरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: TDS is too much in bottled water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.