एसटी प्रवाशांना 30 रुपयांत मिळणार चहा नाश्ता

By Admin | Published: October 28, 2016 11:31 AM2016-10-28T11:31:24+5:302016-10-28T11:31:24+5:30

एसटी महामंडळाने '30 रुपयांत चहा-नाश्ता’ योजना आणली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गावरील 22 अधिकृत थांब्यांवर ही सेवा सुरु केली आहे.

Tea breakfast for ST passengers will get 30 rupees | एसटी प्रवाशांना 30 रुपयांत मिळणार चहा नाश्ता

एसटी प्रवाशांना 30 रुपयांत मिळणार चहा नाश्ता

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - एसटीने प्रवास करताना खासगी हॉटेल्सवर बस थांबली तरी त्यांचं महाग जेवण पाहून अनेकदा प्रवासी काही खाणं टाळतात. खासगी हॉटेलचालकांकडून प्रवाशांची होणारी ही लूट रोखण्यासाठी एसटी महामंडळाने पाऊल उचललं आहे. एसटी महामंडळाने '30 रुपयांत चहा-नाश्ता’ योजना आणली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गावरील 22 अधिकृत थांब्यांवर ही सेवा सुरु केली आहे.
 
ऑगस्ट महिन्यापासूनच ही योजना सुरु करण्यात आली होती, मात्र अनेक प्रवाशांना या योजनेबद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रशासनाने वाहकांच्या हस्ते पत्रक देऊन प्रवाशांना या योजनेची माहिती देणं सुरु केलं आहे. या योजनेनुसार एसटीच्या प्रवाशांना शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली, मेदूवडा, यांपैकी एक पदार्थ आणि एक कप चहा 30 रुपयांत मिळणार आहे. 

Web Title: Tea breakfast for ST passengers will get 30 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.