बेईमानी करणाऱ्या भाजपला धडा शिकवा - शिवसेना
By admin | Published: January 12, 2017 12:13 PM2017-01-12T12:13:51+5:302017-01-12T12:37:48+5:30
ठाणे आणि नागपूरमध्ये स्थानिक पातळीवरील सेना-भाजपा कार्यकर्त्यांचा 'एकला चलो रे' चा सूर समोर आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 12 - एकीकडे मुंबईत शिवसेना-भाजप युतीचे संकेत मिळत असताना नागपूरमध्ये शिवसेना पदाधिकारी युतीला विरोध करत आहेत. तर ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी युतीला विरोध करण्यासाठी पोस्टरबाजी सुरु केली आहे. ठाणे आणि नागपूरमध्ये स्थानिक पातळीवरील सेना-भाजपा कार्यकर्त्यांचा 'एकला चलो रे' चा सूर समोर आला आहे.
नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत आणि शिवसेना आमदारांनी विशेष मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये आणि पदाधिकाऱ्यांना युती नको आहे, भाजपा हा शिवसेनेचा क्रमांक एकचा शत्रू असल्याचा प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. शिवसेना नागपुरात स्वबळावर सर्व जागा लढवण्यासाठी तयार आहे, असा विश्वास या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला आहे.
नागपुरात शिवसेनेची ताकत दाखवून द्या. बेईमानी करणाऱ्या भाजपला धडा शिकवा. आपली स्पर्धा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी नाही. आमचा नंबर एकचा शत्रू बेईमान भाजपच आहे, असे सूर शिवसैनिकांच्या मेळाव्यात उमटले. नागपूर महापालिका निनडणुकीत भाजपासोबत युती करायची की स्वबळावर निवडणुक लढवायची याच्या पडताळणीसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात होतं.