शिक्षकाने हुंड्यासाठी लग्न मोडले
By admin | Published: May 1, 2017 04:03 AM2017-05-01T04:03:39+5:302017-05-01T04:03:39+5:30
साक्षगंध झाल्यानंतर हुंड्यासाठी एका शिक्षकाने लग्न मोडल्याने मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध तक्रार
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : साक्षगंध झाल्यानंतर हुंड्यासाठी एका शिक्षकाने लग्न मोडल्याने मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याच्या आधारे पोलिसांनी शिक्षकासह त्याच्या आई-वडिलांनाही अटक केली आहे.
अमोल श्यामराव लांजेवार असे या शिक्षकाचे नाव आहे़ साक्षगंध झाल्यानंतर मुलीच्या वडिलांकडून
त्याने पैशांची मागणी केली़ मुलीच्या घरांची त्यांची समजूत काढली़ मात्र पैसे न मिळाल्याने त्याने लग्न मोडले़ (तालुका प्रतिनिधी)
"
अमोल ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारणी विद्यालयात अध्यापक असून केवळ हुंड्यासाठी लग्न मोडण्यात आल्याने मुलीच्या वडिलांनी लांजेवार कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविली. यावर पोलिसांनी अमोल व त्याच्या आई-वडिलांना ब्रह्मपुरी येथून अटक केली.