शिक्षक कुटुंबे आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Published: October 19, 2015 02:52 AM2015-10-19T02:52:33+5:302015-10-19T02:52:33+5:30

आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Teacher families are in the agitation of the protest | शिक्षक कुटुंबे आंदोलनाच्या पवित्र्यात

शिक्षक कुटुंबे आंदोलनाच्या पवित्र्यात

Next

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत निर्णय न घेतल्यास आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेतील शिक्षक १ डिसेंबरपासून कुटुंबीयांसह मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत.
शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समितीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, विरोधी पक्षनेते यांनाही निवेदन दिले. आंतरजिल्हा बदल्या न झाल्याने १० ते १५ वर्षांपासून राज्यातील जवळपास १२ हजार शिक्षकांपैकी काही आई-वडिलांपासून, तर कोणी पत्नी-मुलांपासून दूर आहेत.
प्रत्येक कुटुंबाचे वेगळे दु:ख आहे. विस्कळीत कुटुंबांची व्यथा घेऊन १२ मे रोजी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. २८ जुलैला मुंबईतील आझाद मैदानात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणही केले. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
५ सप्टेंबरला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
मात्र, त्याचाही उपयोग झाला नसल्याचे समितीचे राज्य अध्यक्ष
अमर शिंदे, कार्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड आणि सचिव हनुमंत खुणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
(प्रतिनिधी)
>राज्याचे रोस्टर एकच करा
जिल्हानिहाय असलेले रोस्टर राज्यस्तरावर एकच करा. आंतरजिल्हा बदलीसाठी समान जात संवर्गाची अट रद्द करून उमेदवार ते उमेदवार करा, पती-पत्नी एकत्रीकरण प्रस्ताव विनाअट, विनाविलंब निकाली काढा, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले.
>बीड जिल्ह्यातील शिक्षक यवतमाळमध्ये कार्यरत आहेत. वडिलांना ते एकुलते एक. वडिलांच्या शरीरात अपेक्षित प्लेटलेट तयार होत नसल्याने दर १५ दिवसांनी रक्त तपासणी करावी लागते. त्याचा अहवाल औरंगाबादला द्यावा लागतो. त्यामुळे या शिक्षकाला दर १५ दिवसांनी यवतमाळवरून येऊन कसरत करावी लागते. वडिलांना त्यांची धावपळ पाहवत नाही. ते मुलाला म्हटले, तुझी ही धावपळ पाहवत नाही. नाहीतरी वय झाले आहे. मरू दे असेच मला.

Web Title: Teacher families are in the agitation of the protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.