भरवर्गात शिक्षकानेच विद्यार्थिनीचा केला विनयभंग
By Admin | Updated: January 20, 2017 12:44 IST2017-01-20T12:44:30+5:302017-01-20T12:44:30+5:30
अलिबागमधील चौल येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकानंच भरवर्गात विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भरवर्गात शिक्षकानेच विद्यार्थिनीचा केला विनयभंग
ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 20 - अलिबागमधील चौल येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकानंच भरवर्गात विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप या शिक्षकाविरोधात करण्यात आला आहे. अनिल पाटील असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या तो फरार आहे.
अनिल पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते असून अलिबाग तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनी परीक्षेचा पेपर लिहित असताना अनिल पाटीलने तिच्या बाकाशेजारी उभे राहून तिचा विनयभंग केला.
या वेळी पीडित विद्यार्थिनीने दुसऱ्या शिक्षकांना याची माहिती दिली. त्यानंतर पाटीलला वर्गातून बाहेर काढण्यात आले. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.