शिक्षक आंतरजिल्हा बदली धोरण मंगळवारी ठरणार

By admin | Published: March 13, 2017 03:48 AM2017-03-13T03:48:06+5:302017-03-13T03:48:06+5:30

राज्यातील २५ ते ३० हजार आंतरजिल्हाबदलीग्रस्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून यासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी ग्रामविकास सचिवांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे.

Teacher Interchange Change policy will be on Tuesday | शिक्षक आंतरजिल्हा बदली धोरण मंगळवारी ठरणार

शिक्षक आंतरजिल्हा बदली धोरण मंगळवारी ठरणार

Next

औरंगाबाद : राज्यातील २५ ते ३० हजार आंतरजिल्हाबदलीग्रस्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून यासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी ग्रामविकास सचिवांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न ‘लोकमत’ने लावून धरला होता. यासंदर्भात शिक्षक सहकार संघटनेने सतत पाठपुरावा केल्यानंतर धोरण निश्चितीसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सध्या आंतरजिल्हा बदलीमध्ये आपसी बदलीसाठी जात संवर्गाची अट मोठी अडचण ठरत आहे. संवर्ग न मिळालेले हजारो प्रस्ताव अडकून पडले आहेत. या आंतरजिल्हाबदलीग्रस्तांमध्ये राज्यभरात पती-पत्नी एकत्रीकरणाचे पाच हजार प्रस्ताव प्रतीक्षेत आहेत.
याशिवाय अपंग, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता, अट शिथील, एकतर्फी असे अनेक प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. आदिवासी भागात बदलीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षकही मोठ्या संख्येने आहेत.
या सर्वांच्या नजरा या बैठकीकडे असून त्यातून निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी व्यक्त
केली. (प्रतिनिधी)

Web Title: Teacher Interchange Change policy will be on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.