आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांचे आंदोलन
By admin | Published: April 7, 2016 02:20 AM2016-04-07T02:20:45+5:302016-04-07T02:20:45+5:30
आंतरजिल्हा बदलीसाठी मोर्चे काढले, आंदोलने केली, निवेदने दिली. मात्र, केवळ आश्वासने पदरी पडल्याने, शिक्षकांनी सोमवारी मुंबईत वेगवेगळ्या पद्धतीने लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीसाठी मोर्चे काढले, आंदोलने केली, निवेदने दिली. मात्र, केवळ आश्वासने पदरी पडल्याने, शिक्षकांनी सोमवारी मुंबईत वेगवेगळ्या पद्धतीने लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील २५ हजार शिक्षक १० ते १५ वर्षे बदलीपासून वंचित आहेत. त्यांना न्याय मिळावा, यासाठी शिक्षक आंतरजिल्हा कृती समिती पाठपुरावा करीत आहे. आतापर्यंत शासनाने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची अंमलबजावणी जिल्हा परिषदांकडून होत नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, असे संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मागण्या काय? : वस्तीशाळा शिक्षकांप्रमाणे पोकळ बिंदुनामावली तयार करण्यात यावी, राज्य रोस्टर एक करावे, आंतरजिल्हा बदलीसाठी समान जात संवर्गाची अट रद्द करून उमेदवार ते उमेदवार करावी, २० पटांच्या आतील शाळा बंद करू नयेत, १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीत रूजू झालेल्या शिक्षकांना १९८२ ची पेन्शन योजना सुरू करावी, अशा शिक्षकांच्या मागण्या आहेत.