शिक्षक हा समाजपरिवर्तन घडविणारा घटक
By admin | Published: September 6, 2014 12:33 AM2014-09-06T00:33:42+5:302014-09-06T00:33:42+5:30
शिक्षक हा समाजपरिवर्तन करणारा घटक आहे. विद्याथ्र्याच्या को:या मनावर संस्कार करण्याचे काम शिक्षक करीत असतो.
Next
पुणो : शिक्षक हा समाजपरिवर्तन करणारा घटक आहे. विद्याथ्र्याच्या को:या मनावर संस्कार करण्याचे काम शिक्षक करीत असतो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच जगण्याची कलाही शिक्षक शिकवत असतात, असे मत महापौर चंचला कोद्रे यांनी आज व्यक्त केले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुणो महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षक गौरव पुरस्कार समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी शहरातील उल्लेखनीय कामगिरी करणा:या शिक्षकांचा सत्कार महापौरांच्या हस्ते करण्यात आला. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, माजी महापौर वैशाली बनकर, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी व्यक्त केले. शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, उपाध्यक्ष नुरद्दीन सोमजी, शिक्षण प्रमुख बबन दहिफळे, प्राथमिकचे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया, सुनील बनकर आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना काकडे म्हणाले, गुरू-शिष्य परंपरा अनादी काळापासून परंतु सध्या गुरू-शिष्य या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे.
बदलत्या समाजामुळे हे घडत आहे. सध्या समाजात काही शिक्षकांकडून घडणा:या वाईट कृत्यामुळे सगळ्या शिक्षकांचे नाव बदनाम झाले आहे. गुरू- शिष्याचे आपुलकीचे नाते त्यामुळे दुरावले आहे. या कार्यक्रमात शिक्षण मंडळाच्या वतीने महापालिका शाळा, तसेच शहरातील खासगी शाळांमधील विशेष उल्लेखनीय कार्य करणा:या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
(प्रतिनिधी)
पुरस्कार.. शिक्षक दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेतील शिक्षिका अपर्णा निंबाळकर यांचा सत्कार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपस्थित महापौर चंचला कोद्रे, शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, उपाध्यक्ष नरूद्दीन सोमजी व इतर.