शिक्षक पाळणार काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2015 01:25 AM2015-09-01T01:25:06+5:302015-09-01T01:25:06+5:30
राज्यातील अनुदान पात्र ठरलेल्या विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी करत महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृति समितीने ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी काळा
मुंबई : राज्यातील अनुदान पात्र ठरलेल्या विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी करत महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृति समितीने ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी अनुदान देण्याचे आश्वासन पाळले नसल्याने शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे कृती समितीचे मुंबई अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
रेडीज म्हणाले की, अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांनी १३ ते २९ जुलै दरम्यान आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. त्यानंतर अनुदान तत्काळ देण्याचे आश्वासन देत मुख्यमंत्री, अर्थ मंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार कृति समितीने आंदोलन स्थगित केले होते.