आॅनलाइन कामांमुळे शिक्षक त्रस्त
By admin | Published: September 21, 2015 01:06 AM2015-09-21T01:06:32+5:302015-09-21T01:06:32+5:30
शिक्षण विभाग आॅनलाइन करण्याचा ध्यास शासनाने घेतला आहे. मात्र नियोजनाचा अभाव व दुर्लक्षामुळे आॅनलाइन प्रक्रिया वारंवार बंद पडत असल्याने
नागपूर : शिक्षण विभाग आॅनलाइन करण्याचा ध्यास शासनाने घेतला आहे. मात्र नियोजनाचा अभाव व दुर्लक्षामुळे आॅनलाइन प्रक्रिया वारंवार बंद पडत असल्याने कुठलेच काम पूर्णत्वास जात नाही. सध्या संचमान्यता, सरल, वेतनाची बिले आॅनलाइन सबमिट करायची आहेत. या कामात कधी सॉफ्टवेअर हँग होत आहे, तर कधी तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहेत. त्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे.
शिक्षकांमध्ये सध्या सरलच्या कामाची चर्चा चांगलीच रंगत आहे. राज्यभरात हे काम करायचे होते. मात्र वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने शिक्षण विभागाने प्रत्येक विभागाला ठरावीक कालावधी दिला होता. या कालावधीतही वेबसाईट सुरू झाली नाही. त्यामुळे सरलचे काम रखडले होते. वेबसाइट सुरू असली तरी सण असल्याने शिक्षक सुट्टीवर आहेत, त्यामुळे काम खोळंबले आहे.