‘सेल्फी’ निर्णयावर शिक्षक घालणार बहिष्कार

By admin | Published: November 7, 2016 01:28 AM2016-11-07T01:28:13+5:302016-11-07T01:28:13+5:30

शालेय शिक्षण विभागाने महिन्याच्या दर सोमवारी विद्यार्थांचा सेल्फी काढण्याचा नुकताच घेतलेल्या निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये नाराजी आहे

Teachers 'decision to boycott teachers' decision | ‘सेल्फी’ निर्णयावर शिक्षक घालणार बहिष्कार

‘सेल्फी’ निर्णयावर शिक्षक घालणार बहिष्कार

Next

बारामती : शालेय शिक्षण विभागाने महिन्याच्या दर सोमवारी विद्यार्थांचा सेल्फी काढण्याचा नुकताच घेतलेल्या निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये नाराजी आहे. हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. राज्यातील शिक्षकांची प्रमुख प्रातिनिधिक संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण विभागाने घेतलेला ‘सेल्फी’च्या निर्णयाला विरोध
केला आहे. या शासन निर्णयावर संपूर्ण राज्यभर बहिष्कार घालण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार प्रत्येक सोमवारी वर्ग शिक्षकाने १० विद्यार्थांचा गट तयार करायचा आहे. या गटाचा स्वत:सोबत सेल्फी घेऊन तो सरल मध्ये ‘आॅन लाईन अपलोड’ करायचा आहे. विद्यार्थांचे आधार क्रमांकदेखील ‘अपलोड’ करण्याचे आदेश आहेत. या निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या निर्णयामुळे शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा नाहक वेळ वाया जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये नेटसाठी पुरेशी रेंज मिळत नसल्याने शिक्षकांना शाळा सोडुन जवळच्या मोठ्या गावी माहिती सरल प्रणालीत भरण्यासाठी जावे लागणार आहे. राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या विरोधात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार विद्यार्थी गळती, गैरहजेरीचा व सेल्फीचा संबंध येत नाही. ही माहिती सरलमध्ये भरण्यासाठी शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
शिक्षकांना सध्या विविध कामे करावी लागत आहेत. सरलमध्ये संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरणे, विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला आॅनलाइन देवाणघेवाण, शिक्षकांची माहिती आॅनलाईन भरणे, शाळेतील सर्व सोईसुविधांची माहिती, मध्यान्ह भोजन योजनेतील लाभार्थ्यांची माहिती रोजच्या रोज भरणे, इयत्ता ५ वी व ८ वी चे शिष्यवृत्ती अर्ज, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अर्ज, सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती अर्ज, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्ज, इस्पयार अवॉर्ड योजनेची माहिती, स्वच्छ भारत विद्यालय योजनेची माहिती, शिक्षकांची प्रशिक्षणाची माहिती, शिक्षकांचे वेतनासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आॅनलाईन वेतन मागविणे, आदी कामांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच, सध्या शिक्षकांना आधीच अनेक प्रकारच्या माहिती आॅनलाइन भराव्या लागत आहेत. ही माहिती आॅनलाइन भरण्यासाठी शाळास्तरावर संगणक, विद्युत पुरवठा, तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ही सर्व कामे बाहेरून करून घ्यावी लागतात. शासनाने ४ टक्के सादील बंद केल्यामुळे या सर्व बाबीचा आर्थिक भुर्दंड मुख्याध्यापकास सहन करावा लागत आहे. या सेल्फीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध आहे. ही सेल्फिची सक्ती तत्काळ रद्द करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने या परिपत्रकाच्या अंमलबजावणीवर बहिष्काराचा निर्णय शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व मार्गदर्शक प्रा.एस.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणिस खंडेराव ढोबळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Teachers 'decision to boycott teachers' decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.