हिवाळी अधिवेशनावर धडकणार शिक्षकांची दिंडी
By admin | Published: November 23, 2015 02:41 AM2015-11-23T02:41:11+5:302015-11-23T02:41:11+5:30
राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानास पात्र घोषित शाळांना निधीची तरतूद करावी, तसेच अनुदानास पात्र घोषित न झालेल्या खासगी प्राथमिक
कोल्हापूर : राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानास पात्र घोषित शाळांना निधीची तरतूद करावी, तसेच अनुदानास पात्र घोषित न झालेल्या खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना हिवाळी अधिवेशनापूर्वी अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी १ ते ११ डिसेंबरदरम्यान शेगाव ते नागपूर शिक्षकांची पायी दिंडी काढण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती व शिक्षक आघाडीने घेतला आहे.
शाहू स्मारक भवन येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, ‘विनाअनुदानित शाळा व तुकड्यांना निधीच्या तरतुदीबाबत वर्षभरापासून सरकार निव्वळ आश्वासने देत आहे. याबाबत वारंवार आंदोलन करूनही शासनाला जाग येत नसल्याने निर्णायक लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिंडीदरम्यान समाजप्रबोधनपर भजन, कीर्तन व शिक्षकांच्या व्यथाही मांडल्या जाणार आहेत, तसेच पायी दिंडी प्रवास करत असताना शिक्षक भिक्षा मागणार आहेत.’ (प्रतिनिधी)