शिक्षकी पेशा...नको रे बाबा! केवळ ९ हजार ८४६ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:53 AM2017-08-02T03:53:52+5:302017-08-02T03:53:57+5:30

प्राथमिक शाळांमधील शिक्षकपदाची पात्रता असलेल्या डी. एड. (डीटीएड) अभ्यासक्रम प्रवेशाच्या सर्व ५ फे-या पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील एकूण ६० हजार जागांपैकी ५० हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.

Teacher's Occupation ... Do not ray Baba! Only 9 thousand 846 entrances | शिक्षकी पेशा...नको रे बाबा! केवळ ९ हजार ८४६ प्रवेश

शिक्षकी पेशा...नको रे बाबा! केवळ ९ हजार ८४६ प्रवेश

Next

दीपक जाधव।
पुणे : प्राथमिक शाळांमधील शिक्षकपदाची पात्रता असलेल्या डी. एड. (डीटीएड) अभ्यासक्रम प्रवेशाच्या सर्व ५ फे-या पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील एकूण ६० हजार जागांपैकी ५० हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. मिळणा-या नोक-यांची शक्यता खूपच कमी उरल्याने शिक्षकी पेशाला नकार मिळत आहे. यंदा डी.एड.साठी १६ टक्के प्रवेश होऊन अनेक जागा रिक्त राहिल्याने अध्यापक महाविद्यालयांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ९४९ डी.एड. महाविद्यालयांच्या ६० हजार जागांसाठी आॅनलाइन पद्धतीने ३१ मे ते ३१ जून या कालावधीत प्रवेशाच्या ५ फेºया पार पडल्या. यासाठी राज्यभरातून १० हजार ८०० अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी ९ हजार ८४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
डीएड प्रवेश स्थिती-
एकूण महाविद्यालये : ९४९
एकूण जागा : ६० हजार
प्रवेशासाठीचे अर्ज : १० हजार ८००
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ९ हजार ८४६
रिक्त जागा : ५० हजार १५४

Web Title: Teacher's Occupation ... Do not ray Baba! Only 9 thousand 846 entrances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.