शिक्षकाची आत्महत्या; माजी केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा

By admin | Published: November 16, 2015 03:07 AM2015-11-16T03:07:41+5:302015-11-16T03:07:41+5:30

नवलभाऊ कृषी महाविद्यालयातील शिक्षक विजय गरबड पाटील (४४, रा. ओम अपार्टमेंट, अमळनेर) यांनी राहत्या घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

Teacher's suicide; Crime against former Union Ministers | शिक्षकाची आत्महत्या; माजी केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा

शिक्षकाची आत्महत्या; माजी केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा

Next

अमळनेर (जि. जळगाव) : नवलभाऊ कृषी महाविद्यालयातील शिक्षक विजय गरबड पाटील (४४, रा. ओम अपार्टमेंट, अमळनेर) यांनी राहत्या घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संस्था अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, दोन प्राचार्यांसह १० जणांवर रविवारी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
विजय यांची पत्नी वैशाली पाटील रविवारी माहेरून परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विजय पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सहा पानी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी १० जणांची नावे लिहिलेली आहेत. वैशाली पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला विजय नवल पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ई. एन. पाटील, आयटीआयचे प्राचार्य के. व्ही. बाविस्कर, किशोर चिकाटे, गोविंद पौलाद पाटील, बबन भिला पाटील, मिलिंद वामनराव बोरसे, भागवत केशव सूर्यवंशी, सुरेंद्र जिजाबराव पवार, विलास शांताराम पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. (प्रतिनिधी)
विजय पाटील यांच्या कुटुंबातील ३-४ सदस्य संस्थेत नोकरीला आहेत. विजय हे केवळ उपस्थितीची सही करून निघून जात होते. त्यांच्या तासिका इतरांना घ्याव्या लागत, असे चिठ्ठीत नाव असलेल्या शिक्षकांनी मला आधी खूप वेळा सांगितले होते. तो व्यसनाधिन होता किंवा त्याने उसनवारीमुळे आत्महत्या केली काय? याबाबत पोलीस तपास करतील. माझ्यावरील आरोप निराधार आहेत.
- विजय नवल पाटील,
माजी केंद्रीय मंत्री

Web Title: Teacher's suicide; Crime against former Union Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.