शिक्षकांनी स्वखर्चातून केला शाळेचा कायापालट
By admin | Published: October 7, 2016 04:29 PM2016-10-07T16:29:29+5:302016-10-07T16:29:29+5:30
बुलडाण्यातील मोताळा तालुक्यात सर्वप्रथम शालेय विद्यार्थ्यांना ई-लर्निंगमध्ये तंत्रज्ञानाचे धडे देणाºया खेडी येथील मराठी प्राथमिक शाळेने गरूडझेप घेत संपूर्ण शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले.
Next
मुरलीधर चव्हाण, ऑनलाइन लोकमत
मोताळा (बुलडाणा), दि. ७ - तालुक्यात सर्वप्रथम शालेय विद्यार्थ्यांना ई-लर्निंगमध्ये तंत्रज्ञानाचे धडे देणाºया खेडी येथील मराठी प्राथमिक शाळेने गरूडझेप घेत संपूर्ण शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. स्पर्धेच्या युगातील ही गरज ओळखून खेडी येथील शिक्षकांनी स्वखर्चातून व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या सोयी व सुविद्या पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयएसओ नामांकनासाठी वाटचाल करणारी ही दुसरी शाळा असून, सीसीटीव्ही बसविण्यात आल्यामुळे शाळा परिसरावर कॅमेºयाची नजर असणार आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांनी कात टाकली असून, बोराखेडी व खेडी येथील शाळा आयएसओकडे यशस्वी वाटचाल करीत आहेत. यासाठी तालुका गट शिक्षणाधिकारी काळुसे यांच्या मार्गदर्शनात स्वखर्चाने व लोकसहभागातून शाळांचा कायापालट करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. शाळांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी केंद्रप्रमुख, ग्रामस्थ तथा
पदाधिकाºयांकडून पाठपुरावा केल्या जात आहे. खेडी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा ई-लर्निंगचे धडे देणारी तालुक्यातील पहिली शाळा आहे. ई- लर्निंगनंतर शिक्षकांनी शैक्षणिक प्रगती साधत गूणात्मकदृष्ट्या चढता आलेख कायम ठेवण्यासाठी शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची किमया करून दाखविली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारी जिल्ह्यातील ही पहिली प्राथमिक शाळा आहे. अवघड विषयांची गोडी वाढविण्यासाठी या शाळेतील शिक्षक कृतियुक्त शिक्षण देण्याचा उपक्रम घेतात. शाळेला आयएसओ मानांकन मिळावे यासाठी सर्व शिक्षकांचे प्रयत्न सुरू असून, शाळेचा कायापालट करण्यासाठी शिक्षकांनी ठराविक रक्कम शाळेला प्रदान केली. शिवाय शिक्षक पतसंस्था मोताळा व कोºहाळा बाजार केंद्रातील सर्व शिक्षकांनीसुद्धा शाळेच्या आधुनिकतेत भर घालण्यासाठी १७ हजार रूपयांची मदत दिली आहे. या मदतीतूनच गट शिक्षणाधिकारी काळुसे यांच्या मार्गदर्शनात शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे शाळा व परिसरातील सर्व गतीविधींचे थेट प्रक्षेपण मुख्याध्यापकांच्या कक्षात दिसणार आहे. मंगळवारी शाळा समिती अध्यक्ष नाना मोरे यांच्या हस्ते सीसीटीव्ही कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कोºहाळा केंद्र प्रमुख मेमाने,
पालकवर्ग, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका कल्पना लांजुळकर, अनिता वैराळकर, परेश पडोळकर, यांनी परिश्रम घेतले. आभार शाळेची मुख्यमंत्री साक्षी मोरे या विद्यार्थीनिने मानले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.