‘शिक्षकांचे वेतन उशिरा देणाऱ्यांवर कारवाई होणार’
By admin | Published: March 31, 2016 02:14 AM2016-03-31T02:14:28+5:302016-03-31T02:14:28+5:30
राज्यातील समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व आश्रमशाळांतील शिक्षकांचे वेतन महिन्याच्या १ ते ५ तारखेदरम्यान देण्याचे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे
मुंबई : राज्यातील समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व आश्रमशाळांतील शिक्षकांचे वेतन महिन्याच्या १ ते ५ तारखेदरम्यान देण्याचे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी शिक्षक परिषदेला दिले आहे, शिवाय वेतन देण्यात जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासनही कांबळे यांनी दिले.
आमदार रामनाथ मोते यांनी आॅक्टोबर २०११ पासून ते मागील महिन्यापर्यंत दोन ते दहा महिन्यांहून अधिक काळ उशिरा देण्यात येत असलेल्या वेतनाची यादीच कांबळे यांच्यासमोर मांडली. डिसेंबर २०१४, जानेवारी २०१५ व फेब्रुवारी २०१५ या महिन्यांचे वेतन ७ मार्चपर्यंत देण्यात आलेले नसल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. यावर वेतन देताना कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिलीप कांबळे यांनी दिले आहे.