आदिवासी युवकांना हॉटेल व्यवस्थापनाचे धडे!

By Admin | Published: June 11, 2017 02:22 AM2017-06-11T02:22:38+5:302017-06-11T02:22:38+5:30

निसर्ग संंवर्धनासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संघटना (आययूसीएन) आणि ‘मेळघाट फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पेंच’मधील सिल्लरी व पाटणसावंगी

Teaching lessons for tribal youth! | आदिवासी युवकांना हॉटेल व्यवस्थापनाचे धडे!

आदिवासी युवकांना हॉटेल व्यवस्थापनाचे धडे!

googlenewsNext

- राम देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : निसर्ग संंवर्धनासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संघटना (आययूसीएन) आणि ‘मेळघाट फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पेंच’मधील सिल्लरी व पाटणसावंगी येथे कौशल्यावर आधारित निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जन-वन विकास योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांत मेळघाटातील ३४ आदिवासी युवकांनी हॉटेल व आदरातिथ्य व्यवस्थापनाचे धडे गिरविले. प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या युवकांना राज्यातील मोठमोठ्या रिसॉर्ट्स व हॉटेलमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डॉ. श्यामाप्रसाद जन-वन विकास योजनेंतर्गत एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात आॅगस्ट २0१६पासून सुरू असलेल्या या निवासी प्रशिक्षण वर्गाचा आजतागायत एक हजाराहून अधिक युवकांनी लाभ घेतला. यामध्ये पेंच, ताडोबा, बोर, उमरेड, टिपेश्वर, ताडोबासह मेळघाटातील युवकांचा समावेश आहे. हॉटेल आणि आदरातिथ्य व्यवस्थापनाचे धडे घेऊन बाहेर पडलेल्या मेळघाटातील ३४ आदिवासी युवकांना महाबळेश्वर, लोणावळा, पुणे, शिर्डी व राज्यातील अन्य ठिकाणी असलेल्या मोठमोठ्या रिसॉर्ट्स व हॉटेलमध्ये अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘सिल्लरी’प्रमाणेच पाटणसावंगी येथे सुरू असलेल्या एकात्मिक प्रशिक्षण केंद्रात हॉटेल मॅनेजमेंटसह इलेक्ट्रिकल, मोटर मेकॅनिक, टेलरिंग, रेफ्रिजरेटर, एसी, वॉशिंग मशीन दुरुस्तीचे प्रशिक्षण युवकांना दिले जात आहे. सध्याच्या घटकेला या ठिकाणी मेळघाटातील ७0 आदिवासी युवक प्रशिक्षण घेत असून त्यांच्या कौशल्याचा उपयोग अभयारण्यालगतच्या गावांमध्येसुद्धा करता येणार असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि संवर्धन संस्थेचे डॉ. जयदीप दास यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Teaching lessons for tribal youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.