संघाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही -  संघाचे राहुल गांधींना प्रत्युत्तर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 08:48 PM2017-08-17T20:48:03+5:302017-08-17T21:26:40+5:30

नागपूर, दि. 17 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघाचे ...

The team does not need a certificate of certification - a reply to Rahul Gandhi of the team | संघाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही -  संघाचे राहुल गांधींना प्रत्युत्तर 

संघाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही -  संघाचे राहुल गांधींना प्रत्युत्तर 

Next

नागपूर, दि. 17 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघाचे अनेक स्वयंसेवक प्रत्यक्षपणे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. काहींना फाशीदेखील झाली. आरोप करणाऱ्या  राहुल गांधींना मुळात संघच माहीत नाही. त्यांचा जनाधार कमी होतो आहे आणि आपले अपयश लपविण्यासाठी ते त्यांच्या आजी व पणजोबांची कामगिरी सांगत आहेत, या शब्दांत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी त्यांच्यावर टीका केली.
नागपुरात ग्रंथालय भारतीच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी संघाची भूमिका मांडली. समाजाला संघटित करण्यासाठी संघ काम करतो. संघ प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्याात सहभागी झाला नाही, मात्र संघाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरले होते. अगदी महात्मा गांधींच्या जंगल सत्याग्रहात आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देखील १९३० साली सहभागी झाले होते. मात्र असे करीत असताना त्यांनी सरसंघचालकपदाची जबाबदारी डॉ. परांजपे यांच्याकडे दिली होती. अनेक स्वयंसेवकांना फाशीदेखील झाली होती. मात्र राहुल गांधी हे त्यांना माहीत असलेला इतिहास सांगत आहेत. त्यांना संघदेखील माहीत नाही. तो जे इतिहास जाणतात त्याचा ह्यप्रपोगंडाह्ण करीत आहेत. संघाला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. संघ आपले काम करीत राहील. प्रत्यक्षात ही चर्चाच योग्य नाही, असे वैद्य यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा
'इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी 
मोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधी

 त्यांनी  खरा भारत नाकारला
२०१४ पूर्वी देशात पुरोगामित्वाच्या नावाखाली खरा भारत व त्याची संस्कृतीच नाकारण्यात आली. आपण जे आहोत, ते आम्ही नाहीत हे सांगण्याची स्पर्धा होत होती. यात काही विदेशी संस्था व देशातीलच विचारधारा सहभागी होत्या. मात्र भारताला नाकारणाऱ्यांचा जनाधार आता संपत आहे. विरोधात प्रचार होत असतानादेखील संघाची स्वीकारार्हता वाढते आहे, असे डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.

{{{{dailymotion_video_id####x845a17}}}}

Web Title: The team does not need a certificate of certification - a reply to Rahul Gandhi of the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.