संघ लोकांना आवडू लागला आहे - मोहन भागवत
By admin | Published: April 24, 2016 10:19 PM2016-04-24T22:19:18+5:302016-04-24T22:19:18+5:30
गेल्या काही वर्षांपासून संघाच्या कार्याचा झपाट्याने विस्तार होत आहे. याबाबतीत सरसंघचालकांनी यावेळी भाष्य केले. संघ आता लोकांना आवडू लागला आहे. संघात न जाणारे लोकदेखील संघाकडे आशेने पाहत आहे
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २४ - गेल्या काही वर्षांपासून संघाच्या कार्याचा झपाट्याने विस्तार होत आहे. याबाबतीत सरसंघचालकांनी यावेळी भाष्य केले. संघ आता लोकांना आवडू लागला आहे. संघात न जाणारे लोकदेखील संघाकडे आशेने पाहत आहे. जनतेचा संघावरील विश्वास वाढतो आहे. आत्मियतेमुळेच हे सर्व शक्य होत आहे. समाज व राष्ट्रहिताचे कार्य करणे महत्त्वाचे. यासाठी कुणाच्या शाबासकीची अपेक्षा ठेवायला नकोत. आम्ही पृथ्वीचा बाजार बनविला नाही, तर पृथ्वीला कुटुंब बनविण्यावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. नागपूरातील ह्यसारथीह्ण या स्वयंसेवी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्ष समारंभाप्रसंगी रविवारी ते बोलत होते.
सरकारकडून विविध मुद्द्यांवर अपेक्षा करण्याचे प्रस्थ वाढले आहे. यातून सरकारला उठसूठ विचारणादेखील केली जाते. यामुळे जगातील लोकांना हा देश नेमका चालतो कसा असा प्रश्न पडतो. यातून विनोदही होतात. परंतु सर्वांनी लक्षात घ्यायला हवे की हा देश सरकार नव्हे तर समाजाची सक्रियता व गुणवत्तेवर चालतो, या शब्दांत डॉ.मोहन भागवत यांनी केंद्रावर टीका करणाऱ्यांना चिमटा काढला आहे.
पुणेकर आळशी, काहीही केले नाही
पुण्यातील उद्योजक डी.एस.कुलकर्णी यांनी यावेळी नागपूरवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करत पुणेकरांना चिमटे काढले. पुणेकरांनी वेगळे असे काहीही केले नाही. ते आळशी आहेत. केवळ मुंबईच्या छायेत असल्यामुळे पुण्याचा विकास झाला. नागपूरात विकासाला प्रचंड संधी आहे. नागपूरातील युवकांनी जगभरात झेंडा रोवला आहे. राजकारणात नसलो तरी जनतेसाठी खूप काही करु शकतो हे ह्यसारथीह्णसारख्या संस्थेने दाखवून दिले आहे, असे डी.एस.कुलकर्णी म्हणाले.