संघाचा समतेचा नारा

By admin | Published: January 4, 2016 01:11 AM2016-01-04T01:11:36+5:302016-01-04T01:11:36+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने आयोजित शिवशक्ती संगमाच्या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणामध्ये महात्मा फुले

Team Samata slogan | संघाचा समतेचा नारा

संघाचा समतेचा नारा

Next

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने आयोजित शिवशक्ती संगमाच्या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडून समतेचा नारा दिला. मनातून विषमता गेली तरच खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होऊ शकेल असे त्यांनी स्पष्ट केले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम होत असल्याचा यावेळी त्याचा आवर्जुन उल्लेख करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित शिवशक्ती संगमामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले यांचे वंशज नितीन फुले, दत्ता फुले आणि रितेश फुले, संघाचे अखिल भारतीय सेवा प्रमुख सुहास हिरेमठ, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पश्चिम प्रांतसंघचालक नानासाहेब जाधव, कायर्वाह विनायकराव थोरात आणि संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुहास हिरमेठ म्हणाले, ‘ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे महाशिबीर आणि सावित्रीबाई यांची जयंती हे दोघेही एकाच दिवशी येणे हा अपूर्व व पवित्र असा योगायोग आहे. प्रतिकूल अशा कालखंडात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे अतिशय कठीण असे कार्य सुरु केले. त्या स्वत: साक्षर झाल्या आणि नंतर समाजाला साक्षर केले.’
शिवशक्ती संगमाचा विश्वविक्रम
शिवशक्ती संगमावर झालेल्या विराट कार्यक्रमाने विश्वविक्रम नोंदविला गेला आहे. या कार्यक्रमाची ‘लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. शिवशक्ती संगमासाठी एक लाखाहून अधिक स्वयंसेवक आणि पन्नास हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. त्यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे एकूण क्षेत्रफळ दोन लाख पन्नास हजार चौरस फूट एवढे होते. मैदानावर आखणी करण्यासाठी साठ टन चुन्याची फक्की वापरण्यात आली होती. संपूर्ण आखणीची लांबी एकूण ७० किलोमीटर एवढी झाली होती. पुण्यातील आणि परगावाहून आलेल्या स्वयंसेवकांसाठी ४३ सिद्धता (तयारी) केंद्रांची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमानंतर परत जाणाऱ्या परगावच्या स्वयंसेवकांना ८० हजार जेवणाची पाकिटे- शिदोरी सोबत देण्यात आली.
या मान्यवरांची होती उपस्थिती
४मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, खासदार श्रीरंग बारणे, अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार संजय भेगडे, मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, माजी स्वागताध्यक्ष भारत देसडला, माजी खासदार प्रदीप रावत, ज्ञानप्रबोधिनीचे वा. ना. अभ्यंकर, उद्योगपती अभय फिरोदिया, लेखक अरुण शेवते, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, डॉ. प्र. ल. गावडे, चित्रकार रवी परांजपे, साहित्य संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार.
४धार्मिक क्षेत्र : शंकराचार्य हभप नारायण महाराज, भय्यूजी महाराज, बंडातात्या कराडकर, गोविंदगिरी महाराज, ग्यानजी चरणसिंग, जैन धर्मगुरू विश्वकल्याण विजयजी महाराज, वारकरी संप्रदायातील मारोती महाराज कुऱ्हेकर, किसन महाराज साखरे, शांतीगिरी महाराज, बालयोगी महाराज, सागरानंद सरस्वती, कलकी महाराज, विश्वशांती केंद्राचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड, देहूगाव येथील तुकाराम महाराज संस्थानाचे माजी अध्यक्ष शिवाजी मोरे, पालखी सोहळ्याचे माजी सोहळाप्रमुख रामभाऊ मोरे, भंडारा डोंगर देवस्थानाचे प्रमुख बाळासाहेब काशीद, संप्रसाद विनोद.

Web Title: Team Samata slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.