संघात फेरबदल?

By admin | Published: March 12, 2015 01:25 AM2015-03-12T01:25:15+5:302015-03-12T01:25:15+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारपासून उपराजधानीत सुरुवात होणार आहे. या सभेत संघाच्या सरकार्यवाहांसोबतच नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे.

Team shuffle? | संघात फेरबदल?

संघात फेरबदल?

Next

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारपासून उपराजधानीत सुरुवात होणार आहे. या सभेत संघाच्या सरकार्यवाहांसोबतच नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. संघात नेमके काय संघटनात्मक बदल होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात होणाऱ्या या तीन दिवसीय सभेत सरकार्यवाह (संघातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पद) या पदाची निवड होणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासमवेत सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह सुरेश सोनी, डॉ. कृष्णगोपाल, दत्ताजी होसबळे यांच्यासह संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच संघ परिवाराच्या विविध संघटनांचे देशभरातील सुमारे १४०० प्रतिनिधी या सभेत सहभागी होणार आहे. यात संघाचे अखिल भारतीय प्रतिनिधी, क्षेत्रीय प्रचारक, माजी प्रांत प्रचारक, सहा सेवा विभागांचे प्रांत प्रमुख, प्रांतस्तराचे कार्यकर्ते, निवडक प्रतिनिधींचा समावेश आहे.

Web Title: Team shuffle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.