राज्यातील तंत्र शिक्षण मंडळाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; येत्या ९ जुलैपासून परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 07:25 PM2020-05-16T19:25:26+5:302020-05-16T19:26:11+5:30

परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार

Technical Education Board examination schedule announces ; Exam from 9th July | राज्यातील तंत्र शिक्षण मंडळाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; येत्या ९ जुलैपासून परीक्षा

राज्यातील तंत्र शिक्षण मंडळाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; येत्या ९ जुलैपासून परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देइतर वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू होणार

पुणे  : राज्यातील तंत्रनिकेतनच्या अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रमासह इतर पाच अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्राच्या व शेवटच्या वर्षीची परीक्षा येत्या ९ जुलैपासून घेण्यात येणार असून परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे,असे तंत्र शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
 करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व अभ्यासक्रमाच्या शेवट्या सत्र किंवा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण मंडळाच्या विद्वत समितीची बैठक नुकतीच पार पडली. त्यात विविध परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत नियोजन करण्यात आले. त्यावर मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक प्रसिध्द केले असून त्यात सहा सत्राच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सहावे सत्र, दोन वर्षाच्या औषधनिर्माण अभ्यासक्रमातील द्वितीय वर्ष, तीन वर्षाच्या मायनिंग अभ्यासक्रमातील तृतीय वर्ष, आठ सत्राच्या पार्टटाईम पदविका अभ्यासक्रमातील आठवे सत्र आणि शासन मान्य अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे अंतिम सत्र या अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे नमूद केले आहे.

 शेवटच्या सत्राच्या किंवा शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काही विषय बॅकलॉग राहिले आहेत. त्यांची परीक्षा १ ते ८ जुलै दरम्यान होणार आहे. ही परीक्षा संस्था स्तरावर घेण्यात येणार आहे. अंतिम सत्राचा/ वर्षाचा अभ्यासक्रम १३ मार्चपर्यंत ९० टक्के पूर्ण झाला होता. त्यावरून परीक्षा घेऊन गुण दिले जाणार आहेत. तर, इतर सत्राच्या किंवा वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुर्वीच्या सत्राच्या गुणांवर व चालू सत्रातील अंतर्गत मूल्यांकनावर गुण दिले जाणार आहेत.  
-----------
 तृतीय सत्रात किंवा पाचव्या सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रथम द्वितीय व तृतीय सत्रातील बॅकलॉगचे विषयात २०२०-२१ च्या पहिल्या सत्रात उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार आहे. इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर, नव्याने प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग येत्या १ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहेत.

Web Title: Technical Education Board examination schedule announces ; Exam from 9th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.