‘तेजस’मुळे दुसऱ्या गाड्यांचा खोळंबा

By admin | Published: June 13, 2017 01:41 AM2017-06-13T01:41:42+5:302017-06-13T01:41:42+5:30

मुंबई-करमळी तेजस एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मान्सून वेळापत्रकामुळे रविवारी तीन तास उशिराने तेजस करमाळीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

'Tejas' detention due to Tejas | ‘तेजस’मुळे दुसऱ्या गाड्यांचा खोळंबा

‘तेजस’मुळे दुसऱ्या गाड्यांचा खोळंबा

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई-करमळी तेजस एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मान्सून वेळापत्रकामुळे रविवारी तीन तास उशिराने तेजस करमाळीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मात्र वेगवान इंजिन क्षमता आणि इलेक्ट्रो-न्यूमॅटिक बे्रकिंग यंत्रणेमुळे निर्धारित वेळेच्या एक मिनिट आधी मुंबईत दाखल झाली. मात्र या गाडीची वेळ साधण्यासाठी इतर गाड्या ठिकठिकाणी रोखून ठेवण्यात आल्या.
मान्सून वेळापत्रकानुसार तेजस एक्स्प्रेस करमळीहून रविवारी सकाळी ७.३० वाजता मुंबईसाठी रवाना होणे अपेक्षित होते. मात्र ती १०.३० वाजता रवाना झाली. करमळी ते मुंबई ७५० किलोमीटरचे अंतर कापत मुंबईत रविवारी सायंकाळी ७.४४ मिनिटांनी तेजस दाखल झाली. तिला रस्ता मोकळा मिळावा यासाठी या कालावधितील काही गाड्या सायडिंगला घेतल्या. त्यामुळे तेजसची मुंबईत आगमनाची वेळ वेळापत्रकानुसार ७.४५ मिनिटे असतानाही मुंबईत ती ७.४४ वाजता पोहोचली.
तेजस एक्स्प्रेस ही नेहमीच वक्तशीरपणे धावते, अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली. पावसाळ्यात कोकण मार्गावर पावसाचे प्रमाण आणि कोसळणाऱ्या दरडींमुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेजसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. मान्सून वेळापत्रकानुसार ‘तेजस’ आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.

- आपला वेग कायम ठेवत तेजस करमळीहून तीन तास उशिरा निघूनही मुंबईत नियोजित वेळेच्या एक मिनिट आधी आली. मात्र, तेजसचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी इतर गाड्या ठिकठिकाणी रोखून ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती.

तेजस एक्स्प्रेस करमळी - मुंबई
स्थानके स्थानकांतील ताशी वेग
झालेला उशीर (सुमारे)
करमळी ३ तास १५३ किमी
कुडाळ २ तास १७ मिनिटे १५३ किमी
रत्नागिरी१ तास १३७ किमी
पनवेल १४ मिनिटे१२५ किमी
* मुंबई वेळेपेक्षा १ मिनिट आधी

Web Title: 'Tejas' detention due to Tejas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.