"तेजस"मध्ये आता जेवणही मिळणार
By admin | Published: May 27, 2017 01:23 PM2017-05-27T13:23:07+5:302017-05-27T13:23:07+5:30
भारतीय रेल्वेची आधुनिक ओळख बनत असलेली मुंबई-करमळी (गोवा) सुपरफास्ट "तेजस" एक्स्प्रेसमध्ये आता जेवणही पुरवण्यात येणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.27 - भारतीय रेल्वेची आधुनिक ओळख बनत असलेली मुंबई-करमळी (गोवा) सुपरफास्ट "तेजस" एक्स्प्रेसमध्ये आता जेवणही पुरवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे बोर्डाच्या टुरिझम आणि केटरिंग विभागाने हा निर्णय घेतला आहे. IRCTCच्या वतीने प्रवाशांना ही सुविधा पुरण्यात येणार आहे.
दरम्यान, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली मुंबई-करमळी (गोवा) सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस प्रवाशांच्या सोयीची आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे पुढील चार-पाच दिवसांचे आरक्षणदेखील फुल्ल आहे. परंतु बेशिस्त प्रवाशांमुळे तेजसमध्ये सुविधांचा बोजवारा उडाला. प्रवाशांनी आसनांखाली फेकलेले उष्टे खाद्यपदार्थ तसेच बायो शौचालयांचा केलेला गैरवापर यामुळे तेजसमध्ये अस्वच्छता व दुर्गंधी पसरली.
तेजसमध्ये मोफत वाय-फाय, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. मात्र मुंबई ते करमळी हा प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी एलईडी स्क्रीनसह दिलेल्या ‘हेडफोन्स’वर डल्ला मारल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
प्रवाशांनी अनेक आसनांखाली उष्टे खाद्यपदार्थ आणि तत्सम फेकलेल्या वस्तूंमुळे गाडी कमालीची अस्वच्छ झाली होती. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असल्यामुळे हा वास अधिकच पसरला.
ट्रेनमधील बायो-शौचालयांचा वापर अयोग्य केल्यामुळे शौचालयांमध्येही दुर्गंधी पसरली. या गाडीमध्ये असलेल्या स्वयंचलित दरवाजामुळे एक प्रवासी रत्नागिरी स्टेशनवर राहून गेल्याचे समोर आले. तथापि, स्वयंचलित दरवाजे हे चोऱ्या आणि अन्य घातपाताच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.