तेजस ठाकरेंनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत शोधला 'हिरण्यकेशी' मासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 11:08 AM2020-10-16T11:08:11+5:302020-10-16T11:08:47+5:30

हिरण्यकश नदीत तेजस ठाकरेंनी शोधला नवा मासा

tejas thackeray discovers rare hiranyakeshi fish in sahyadri | तेजस ठाकरेंनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत शोधला 'हिरण्यकेशी' मासा

तेजस ठाकरेंनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत शोधला 'हिरण्यकेशी' मासा

googlenewsNext

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. आंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारी माशाची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधली आहे. या माशाची ही 20 वी  प्रजाती आहे. तर तेजस ठाकरे यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे. या आधी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पालींच्या दुर्मीळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.

तेजस ठाकरेंनी याआधी शोधलेल्या प्रजातींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी दिली होती. आता हिरण्यकश नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचं नाव 'हिरण्यकेशी' असं ठेवण्यात आलं आहे. हिरण्यकेशी हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ सोनेरे रंगाचे केस असणारा असा होतो. माशाच्या नवीन प्रजातींना शोध घेताना तेजस ठाकरे यांना अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा यांचं सहकार्य मिळालं. 

याआधी तेजस ठाकरे यांनी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला. त्याआधी कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत असताना तेजस  यांनी खेकड्याच्या पाच प्रजाती शोधल्या. खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध  झाला. न्यूझीलंडच्या ‘झुटाक्सा’ या नियतकालिकात आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मिळ खेकड्यांबद्दलचं दुसरं संशोधन प्रसिद्ध झालं होतं. विशेष म्हणजे पश्चिम घाटातील 'सह्याद्री' या रांगड्या मराठी नावावरुन एका खेकड्याचं 'सह्याद्रियाना' असं नामकरण करण्यात आलं होतं.

Web Title: tejas thackeray discovers rare hiranyakeshi fish in sahyadri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.