रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘तेजस्विनी’
By admin | Published: August 10, 2014 06:26 PM2014-08-10T18:26:22+5:302014-08-10T20:54:42+5:30
रेल्वे स्थानकावर महिलांची छेड काढणे, त्यांना त्रास देण्याच्या घटना रोखण्यासाठी महिला पोलिसांचे एक तेजस्विनी पथक
अकोला : रेल्वेमध्ये प्रवास करताना तसेच रेल्वे स्थानकावर महिलांची छेड काढणे, त्यांना त्रास देण्याच्या घटना घडत असतात. हे सर्व रोखण्यासाठी महिला पोलिसांचे एक तेजस्विनी पथक तयार करण्यात आले आहे. महिलांना होणारा त्रास रोखणे हाच पथकाचा उद्देश असल्याची माहिती भुसावळ मंडळचे सुरक्षा आयुक्त चंद्रमोहन मिश्र यांनी शनिवारी दुपारी दिली. अकोल्यात गत काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलेल्या तिकीट विक्री घोटाळ्याचा तपास करण्यासाठी मिश्र येथे आले होते. महिलांना प्रवासादरम्यान येणार्या अडचणी सोडविणे, तसेच त्यांना त्रास देणार्या टवाळखोरांवर कारवाई करण्याचे काम तेजस्विनी पथक करणार आहे. हे पथक महिलांनी दिलेल्या तक्रारींचे निवारण करणार आहे. तेजस्विनी पथक सध्या नाशिक, भुसावळ व मनमाड येथे सुरू करण्यात आले असून, अकोल्यातही लवकरच या पथकाची स्थापना करण्यात येणार आहे.