निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी तेलंगाना सरकारचे १२२७ कोटी
By admin | Published: July 6, 2015 01:55 AM2015-07-06T01:55:31+5:302015-07-06T01:55:31+5:30
यवतमाळ जिल्ह्णात होऊ घातलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी तेलंगाना सरकारने आपल्या वाट्याचे एक हजार २२७ कोटी रुपये मंजूर केले आहे.
Next
बी. संदेश, आदिलाबाद
यवतमाळ जिल्ह्णात होऊ घातलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी तेलंगाना सरकारने आपल्या वाट्याचे एक हजार २२७ कोटी रुपये मंजूर केले आहे. या आंतरराज्यीय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा दोनही राज्यांना लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्णाच्या बेला, जैनत आणि तामस या मंडळातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ५.१२ टीएमसी पाण्यासाठी हा निधी मंजूर केल्याचे शनिवारी राज्याचे मुख्य सचिव एस.के. जोशी यांनी जाहीर केले आहे.