तेलंगणाच्या वाहनातून जाणारे सव्वा लाखांचे सागवान सिरोंचात पकडले

By admin | Published: June 21, 2016 06:47 PM2016-06-21T18:47:50+5:302016-06-21T18:47:50+5:30

सिरोंचा वन परिक्षेत्रात वन परिक्षेत्र अधिकारी राकेश सेपट यांच्या मार्गदर्शनात २० जून रोजी गस्त सुरू

Telangana vehicle going to be caught in the serials | तेलंगणाच्या वाहनातून जाणारे सव्वा लाखांचे सागवान सिरोंचात पकडले

तेलंगणाच्या वाहनातून जाणारे सव्वा लाखांचे सागवान सिरोंचात पकडले

Next

ऑनलाइन लोकमत

सिरोंचा, दि. 21 - सिरोंचा वन परिक्षेत्रात वन परिक्षेत्र अधिकारी राकेश सेपट यांच्या मार्गदर्शनात २० जून रोजी गस्त सुरू असताना एक वाहन जंगलात फिरत असल्याचे दिसून आले. या वाहनाचा पाठलाग करीत सिरोंचा ते आलापल्ली महामार्गावर नंदीगाव बसथांब्याजवळ वाहन अडविण्यात आले. या वाहनातून १ लाख २५ हजार १०० रूपये किमतीच्या ४२ नग २.५०२ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले आणि हे वाहन वन कार्यालयात आणण्यात आले.
२० जून रोजी टीएस ०१-यूबी १३९७ क्रमांकाचे वाहन सिरोंचा वन परिक्षेत्रात जंगल परिसरात फिरत असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून आले. या वाहनाचा पाठलाग सुरू केल्यावर ते वाहन सिरोंचा-आलापल्ली महामार्गावर नंदीगाव जवळ थांबविण्यात आले. वाहन थांबतात. वाहनचालक व दुसरा एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. वाहनाची तपासणी केल्यावर तेलंगणा राज्यातील पासिंग असलेल्या या वाहनात सागवान जातीचे कटसाईज सिलपाट ४२ नग आढळून आले. २.५०२ घनमीटरच्या लाकडाची बाजारात किमत १ लाख २५ हजार १०० रूपये आहे, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. सदर वाहन २१ जून रोजी रात्री १.१५ वाजता हे वाहन वन कार्यालयात सिरोंचा येथे आणण्यात आले.

 

Web Title: Telangana vehicle going to be caught in the serials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.