टेलीमेडिसीनची शिवसेनेकडून अंमलबजावणी
By admin | Published: January 28, 2015 05:10 AM2015-01-28T05:10:23+5:302015-01-28T05:10:23+5:30
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या टेलीमेडिसीन योजनेची येत्या २ फेब्रुवारीपासून राज्यात पाच ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्त्वावर
मुंबई : शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या टेलीमेडिसीन योजनेची येत्या २ फेब्रुवारीपासून राज्यात पाच ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्त्वावर पक्षाच्यावतीने स्वबळावर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या योजनेचे प्रात्यक्षिक झाल्यानंतर राज्य सरकारकडून योजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, मेळघाटातील सेमाडोह येथे २ फेब्रुवारीपासून टेलीमेडिसीन योजनेचा प्रारंभ केला जाईल. सर्वप्रथम सेमाडोह हे गाव व्ही-सॅटने जोडण्यात येईल़ त्यानंतर तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना मुंबईतील अंधेरी येथील स्टुडिओमधून वेगवेगळ््या वैद्यकीय शाखांमधील २५ तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभेल.
(विशेष प्रतिनिधी)