‘उपचाराचे दर आधीच सांगा’

By admin | Published: July 2, 2014 04:36 AM2014-07-02T04:36:41+5:302014-07-02T04:36:41+5:30

हॉस्पिटल्स्ने त्यांचे उपचार दर रूग्णाला अथवा त्याच्या नातलगांना उपचार सुरू करण्याआधीच सांगावेत किंवा ते सर्वांना स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी रूग्णालयात प्रदर्शित करावेत, मत उच्च न्यायालय

'Tell the medical rate already' | ‘उपचाराचे दर आधीच सांगा’

‘उपचाराचे दर आधीच सांगा’

Next

मुंबई: हॉस्पिटल्स्ने त्यांचे उपचार दर रूग्णाला अथवा त्याच्या नातलगांना उपचार सुरू करण्याआधीच सांगावेत किंवा ते सर्वांना स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी रूग्णालयात प्रदर्शित करावेत, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
न्यायालय म्हणाले, हॉस्पिटलचे बिल न भरल्याने रूग्णाला डिस्चार्ज न देणे, मृतदेह न देणे असे प्रकार काही रूग्णालये करतात. हे करणे चुकीचे आहे. त्यापेक्षा रूग्णालयांनी त्यांचे दर आधीच रूग्णाला सांगावेत. तसेच अनेक डॉक्टर तपासायलाही येत नाहीत व त्यांची फी बिलामध्ये नमूद केलेली असते.
मुळात रूग्णालयांनी रूग्णांची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. कारण काही रूग्ण दागिने विकून उपचार घेत असतात, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले. यासोबत न्यायालयाने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया व धर्मादाय आयुक्त यांनाही याप्रकरणी नोटीस जारी केले असून यासाठी काही नियमावली तयार केली जाऊ शकते का याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Tell the medical rate already'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.