‘आधार दिंडी’ची उद्या सांगता
By admin | Published: January 29, 2016 01:49 AM2016-01-29T01:49:01+5:302016-01-29T01:49:01+5:30
ग्रंथराज ज्ञानेश्वरीला ७२५वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संतभूमी मराठवाड्यात वारकरी साहित्य परिषदेने काढलेल्या ज्ञानोबा तुकोबा आधार
- लोकमत मीडिया पार्टनर
औरंगाबाद : ग्रंथराज ज्ञानेश्वरीला ७२५वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संतभूमी मराठवाड्यात वारकरी साहित्य परिषदेने काढलेल्या ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचा समारोप शनिवारी औरंगाबाद येथे होत आहे.
या दिंडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये विविध मुद्द्यांबाबत जागृती निर्माण करण्यात आली. समारोपाची आधार दिंडी सकाळी १० वाजता क्रांती चौकातून निघून गांधी पुतळा-जिल्हाधिकारी कार्यालय अशी जाईल. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह डॉ.सदानंद मोरे. ह.भ.प. अभय टिळक, बापुसाहेब देहूकर, बाळासाहेब देहूकर, माधव महाराज शिवणीकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.