राज्य गारठायला सुरुवात; 8.8 अंशांपर्यंत तापमान घसरले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 10:22 AM2020-12-05T10:22:11+5:302020-12-05T10:25:25+5:30
Cold Wave: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुलाबी थंडीने पहाट उजाडली होती. मात्र, त्यानंतर अचानक तापमान वाढू लागले होते.
मुंबई : दिवाळीनंतर गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे. आज राज्यभरात 8.8 अंशांपर्यंत तापमान खाली आले होते. परभणीमध्ये 8.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यभरात हिवाळ्याचा चाहूल लागली आहे. नाशिकमध्ये 11.1 डिग्री, परभणी 10.6, परभणी कृषी विद्यापीठ 8.8, पुणे 11.5, सांताक्रूझ 18.4, जळगाव 12.6, बारामती 11.9, औरंगाबाद 13.0, गोंदिया 10.5, नागपूर 12.4 एवढे किमान तापमान नोंदविले गेले.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुलाबी थंडीने पहाट उजाडली होती. मात्र, त्यानंतर अचानक तापमान वाढू लागले होते. मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान २५ अंशांवर गेले होते. तापमानातील वाढीमुळे ऐन दिवाळीत थंडी गायब झाली होती. मुंबईच्या किमान तापमानात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगली घसरण झाली होती. ते १९ अंशांच्या आसपास गेले हाेते. त्यामुळे गेला आठवडाभर मुंबईत थंडी होती. दिवाळीदरम्यान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार, तापमानात वाढ नोंदविण्यात आली.
थंडीमुळे कोरोनाची पुन्हा मोठी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.