तापमानाचे हेलकावे; मुंबई १६ अंशावर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:47 AM2019-01-19T05:47:20+5:302019-01-19T05:47:26+5:30
मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात येत आहे.
मुंबई : मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात येत आहे. मुंबईसह राज्यातील तापमानात होणारे हे बदल नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मागील तीन दिवसांपासून हा बदल नोंदविण्यात येत असून, मुंबईचे किमान तापमान १६ अंशांच्या आसपास स्थिर असले तरी ‘ताप’दायक सूर्यकिरणांमुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे रात्रीच्या वातावरणातील गारवा काही अंशी कमी झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, येथील गारवा कायम असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.
गोव्यासह संपूर्ण राज्यात चार दिवस हवामान राहणार कोरडे
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे किमान तापमान शुक्रवारी १६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे ८.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. १९ ते २२ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. तर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामान शनिवारसह रविवारी कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३३, १७ अंशांच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे; तर उर्वरित भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.