चंद्रपुरात तापमानाचा हंगामातील उच्चांक
By Admin | Published: May 1, 2015 02:06 AM2015-05-01T02:06:53+5:302015-05-01T02:06:53+5:30
राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे दूर सरल्याने तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूरमध्ये नोंदविले गेले.
पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे दूर सरल्याने तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूरमध्ये नोंदविले गेले. यंदाच्या हंगामातील हा उच्चांक आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील शहरांच्या कमाल तापमानात गुरुवारी लक्षणीय वाढ नोंदविली गेली. तापमान सरासरीपेक्षा १ ते ३ अंशांनी वाढले होते. त्यामुळे राज्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
कुठे किती तापमान : पुणे ३८.९, नाशिक ३८, सातारा ४०, मुंबई ३५.२, रत्नागिरी ३३.२, डहाणू ३४.७, औरंगाबाद ४१.४, परभणी ४२.५, अकोला ४२.८, अमरावती ४०.८, बुलडाणा ४०.३, ब्रह्मपुरी ४३.५, चंद्रपूर ४४.८, नागपूर ४३.२, वाशिम ४०.४, वर्धा ४४.१, यवतमाळ ४२