तापमानात वाढ; मुंबईला पावसाचा इशारा

By admin | Published: October 25, 2015 02:28 AM2015-10-25T02:28:27+5:302015-10-25T02:28:27+5:30

आॅक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरू होत असतानाच येथे होणाऱ्या वातावरणीय बदलाने मुंबईकर हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेने मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत

Temperature rise; Rain Warning to Mumbai | तापमानात वाढ; मुंबईला पावसाचा इशारा

तापमानात वाढ; मुंबईला पावसाचा इशारा

Next

मुंबई : आॅक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरू होत असतानाच येथे होणाऱ्या वातावरणीय बदलाने मुंबईकर हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेने मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत असून, दिवसासह रात्रीही जाणवणारा उकाडा मुंबईकरांना असह्य झाला आहे. त्यात आता पुढील ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसराला हवामान खात्याने हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाढत्या उष्णतेसह उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. १५ आॅक्टोबरपासून मुंबई शहराचे कमाल तापमान सलग ३६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत आहे; शिवाय किमान तापमानही २४-२६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. दिवसासह रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली आहे. परिणामी, मुंबईकर घामाने हैराण झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ३६ अंशावर चढलेले कमाल तापमान खाली उतरत नसल्याने मुंबईकरांना भरदिवसा उन्हाचे चटके बसत आहेत. त्यात वातावरणीय बदलामुळे पुढील ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील. शिवाय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशावर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. र(प्रतिनिधी)
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाढत्या उष्णतेसह उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. १५ आॅक्टोबरपासून मुंबई शहराचे कमाल तापमान सलग ३६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत आहे; शिवाय किमान तापमानही २४ ते २६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.

Web Title: Temperature rise; Rain Warning to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.