राज्यातील तापमानात वाढ; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 08:37 PM2019-12-10T20:37:28+5:302019-12-10T20:46:05+5:30
राज्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली असून थंडी पळाली उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील अनेक शहरात किमान तापमानात उल्लेखनीय वाढ
पुणे : उत्तर भारतातील अनेक राज्यात अवकाळी पाऊस झाला़. तसेच अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली असून थंडी पळाली आहे़. १२ व १३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. राज्यात मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १२़४ अंश सेल्सिअस नोंदविले़.
अरबी समुद्रावरुन पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर हवेचा जोर असून हे वारे आपल्याबरोबर बाष्पही घेऊन येत आहे़. त्यामुळे राज्यातील तापमानात गेल्या दोन दिवसात वाढ झाली आहे़. त्याचबरोबर अफगाणिस्तान, पाकिस्तान दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे़. राजस्थानच्या वर चक्रवाताची स्थिती बनली आहे़. त्यामुळे राजस्थानसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी बर्फवृष्टी तसेच पाऊस पडत आहे़. तसेच बंगालच्या खाडीहून दक्षिणेच्या बाजूने बाष्पयुक्त वारे येत आहे़. त्याचा परिणाम राज्यातील तापमान वाढीवर झाला आहे़.
मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़ तर कोकणात २ ते ४ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे़. उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील अनेक शहरात किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे़. विदर्भात किमान तापमानात किंचित वाढ नोंदविली आहे़.
१२ डिसेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
इशारा : १२ व १३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
़़
अफगाणिस्तान, पाकिस्तान दरम्यान वातावरणात चक्रवात स्थिती बनली आहे़. तसेच बंगालच्या खाडीतून दक्षिणेच्या बाजूने बाष्पयुक्त वारे वाहत आहे़. त्याचा जोर अधिक असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्याकडे येणे बंद झाले आहे़. तसेच राज्यात अंटी सायक्लोन स्थिती निर्माण झाली आहे़. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ आहे़. दक्षिणेकडून येणाºया वाºयांमुळे विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे़ . ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे़.